येशू ख्रिस्ताचे बारा (बारा) शिष्य/प्रेषित कोण होते?

प्रश्नः येशू ख्रिस्ताचे बारा (बारा) शिष्य/प्रेषित कोण होते? उत्तरः “शिष्य” हा शब्द शिकणार्याचा अथवा अनुयायाचा उल्लेख करतो. “प्रेषित” ह्या शब्दाचा अर्थ आहे “ज्याला पाठविण्यात आले आहे.” येशू पृथ्वीवर असतांना त्याच्या बारा अनुयायांस शिष्य म्हटले जात असे. बारा शिष्य येशू ख्रिस्ताचे अनुसरण करीत, ते त्याच्यापासून शिकले व त्याच्याद्वारे त्यांनी प्रशिक्षण प्राप्त केले. त्याच्या पुनरुत्थानानंतर व स्वर्गारोहणनंतर…

प्रश्नः

येशू ख्रिस्ताचे बारा (बारा) शिष्य/प्रेषित कोण होते?

उत्तरः

“शिष्य” हा शब्द शिकणार्याचा अथवा अनुयायाचा उल्लेख करतो. “प्रेषित” ह्या शब्दाचा अर्थ आहे “ज्याला पाठविण्यात आले आहे.” येशू पृथ्वीवर असतांना त्याच्या बारा अनुयायांस शिष्य म्हटले जात असे. बारा शिष्य येशू ख्रिस्ताचे अनुसरण करीत, ते त्याच्यापासून शिकले व त्याच्याद्वारे त्यांनी प्रशिक्षण प्राप्त केले. त्याच्या पुनरुत्थानानंतर व स्वर्गारोहणनंतर येशूने त्याच्या शिष्यास त्याची साक्ष देण्यासाठी बाहेर पाठविले (मत्तय 28:18-20; प्रेषितांची कृत्ये 1:8). मग त्यांचा उल्लेख बारा प्रेषित म्हणून केला जाऊ लागला. परंतु, येशू पृथ्वीवर असतांनाही, “शिष्य” आणि “प्रेषित” ह्या शब्दांचा आलटून-पालटून उपयोग केला जाई.

बायबल मत्तय 10:2-4 ह्या वचनांत मूळ शिष्यांची/पे्रषितांची यादी मांडते,”त्या बारा प्रेषितांची नांवे अशी आहेतः पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय, शिमोन कनानी व त्याला (येशूला) धरून देणारा यहूदा इस्कर्योत.” तसेच बायबल मार्क 3:13-16 आणि लूक 6:13-16 या वचनांत देखील शिष्यांची/पे्रषितांची यादी मांडते. तीन परिच्छेदांची तुलना केल्यास नावात एखाद दोन लहानसहान फरक आढळून येतात. असे दिसून येते की तद्दय याला “याकोबाचा पुत्र, यहूदा” (लूक 6:16) आणि लेबायस म्हणून देखील ओळखले जात असे (मत्तय 10:3). शिमोन जिलोत यास शिमोन कनानी म्हणून देखील ओळखले जात असे (मार्क 3:18). येशूला पकडून देणार्या, यहूदा इस्कर्योतच्या जागी, बारा शिष्यांनी मत्थियास निवडले (प्रेषितांची कृत्ये 1:20-26 पाहा). काही बायबल शिक्षक मत्थियास “अवैध” प्रेषित म्हणून पाहतात आणि त्यांचा असा विश्वास आहे की बारावा प्रेषित म्हणून यहूदा इस्कर्योतची जागा घेण्यासाठी पौल हा देवाची निवड होता.

बारा शिष्य/पे्रषित हे सर्वसाधारण लोक होते ज्यांचा देवाने असाधारणरित्या उपयोग केला. त्या बारा शिष्यांत मासेकरू, कर घेणारे, आणि क्रांतीकारी होते. शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताचे अनुसरण करणार्या ह्या बारा पुरुषांच्या सतत चुका, संघर्ष, आणि शंकांचे लिखाण आहे. येशूचे पुनरूत्थान आणि स्वर्गारोहण यांची साक्ष दिल्यानंतर, पवित्र आत्म्याने ह्या शिष्यांत/पे्रषितांत बदल घडवून आणला आणि त्यांस देवाचे असे सामथ्र्यवान सेवक बनविले ज्याची जगाची उलटापालट केली (प्रेषितांची कृत्ये 17:6). तो बदल काय होता? बारा शिष्य/पे्रषित “येशूसोबत” होते (प्रेषितांची कृत्ये 4:13). आमच्याविषयी सुद्धा हेच म्हटले जावे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

येशू ख्रिस्ताचे बारा (बारा) शिष्य/प्रेषित कोण होते?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.