शेवटच्या काळाच्या भविष्यवाणीनुसार काय घडून येणार आहे?

प्रश्नः शेवटच्या काळाच्या भविष्यवाणीनुसार काय घडून येणार आहे? उत्तरः शेवटच्या काळाविषयी पवित्र शास्त्र खूप काही सांगते जवळजवळ पवित्र शास्त्राच्या प्रत्येक पुस्तकात शेवटच्या काळाच्या संबंधी केलेल्या भविष्यवाणीचा समावेश आहे. ह्यासर्व भविष्यवाण्या घेणे आणि त्यांना संघटित करणे कठीण होवू शकते. खाली दिलेला एक फार संक्षिप्त सारांश आहे जो शेवटच्या काळी काय घडेल हे जाहीर करतो. अंतराळात उचलले…

प्रश्नः

शेवटच्या काळाच्या भविष्यवाणीनुसार काय घडून येणार आहे?

उत्तरः

शेवटच्या काळाविषयी पवित्र शास्त्र खूप काही सांगते जवळजवळ पवित्र शास्त्राच्या प्रत्येक पुस्तकात शेवटच्या काळाच्या संबंधी केलेल्या भविष्यवाणीचा समावेश आहे. ह्यासर्व भविष्यवाण्या घेणे आणि त्यांना संघटित करणे कठीण होवू शकते. खाली दिलेला एक फार संक्षिप्त सारांश आहे जो शेवटच्या काळी काय घडेल हे जाहीर करतो.

अंतराळात उचलले जाणे (राप्चर ) म्हणून परिचित असलेल्या घटनेत ख्रिस्त नव्याने जन्मलेल्या सर्व विश्वासणार्‍यांना पृथ्वीपासून वर नेईल (1 थेस्स 4:13-18; 1 करिंथ 15:51-54). ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर ह्या विश्वासणार्‍यांनी त्यांच्या पृथ्वीवरील वास्तव्य काळाच्या दरम्यान केलेल्या चांगल्या कार्यांसाठी व विश्वासू सेवेसाठी प्रतिफल दिले जाईल, किवा सेवा व आज्ञापालनाच्या अभावासाठी ते पतिफळ गमवतील, परंतू सार्वकालिक जीवन गमावणार नाही (1करिंथ 2:11-15; 2 करिंथ 5:10).

ख्रिस्त विरोधक (श्वापद) सत्येत येईल आणि इस्राएलासोबत सात वर्षांसाठी एक करार बांधेल, (दानीएल 9:27). हा सात वर्षाचा कालखंड “महासंकटाचा काळ” म्हणून ओळखला जातो. महसंकटाच्या काळात भयंकर युद्ध, दुष्काळ, महामारी व नैसर्गिक अनर्थ येतील. पाप, कुकर्म व दुष्टपणाच्या विरुद्ध देव त्याचा क्रोध प्रवाहरूपाने ओतेल. महसंकटाच्या काळात आकाशवाणीच्या चार घोडेस्वारांचे स्वरूप आणि शिक्षेचे सात शिक्के व शिक्षेच्या कर्ण्या, सात वाट्या ह्यांचा समावेश होईल.

सात वर्षाच्या जवळजवळ अर्ध्या मार्गामध्ये ख्रिस्त विरोधक इस्राइल सोबतचा शांतीचा करार मोडेल आणि त्यांच्याविरुद्ध युद्ध करेल. ख्रिस्तविरोधक “ओसाडीचा अमंगळ पदार्थ होईल आणि येरूश्लेमेच्या मंदिरात पूजले जाण्यासाठी स्वतची एक मूर्ती स्थापित करेल. (दानीएल 9:27; 2 थेस्स 2:3-10) ज्याचे पुनर्निर्माण झालेले असेल. महसंकटाच्या काळाचा दूसरा अर्धा (उत्तरार्ध)भाग मोठे संकट” (प्रकटीकरण 7:14 ) आणि “याकोबाचा क्लेशमय” (यिर्मया 30:7) म्हणून परिचित आहे.

सात वर्षाच्या महासंकट काळाच्या शेवटी, ख्रिस्तविरोधक येरुषलेमेवर शेवटच्या हल्ल्याला सुरवात करेल, ज्याची पराकाष्ठा हर्मगिदोनच्या लढाईत होईल. येशी ख्रिस्त परत येईल, ख्रिस्त विरोधक व त्याच्या सैन्याचा नाश करेल आणि त्यांना अग्नि सरोवरांत टाकेल (प्रकटीकरण 19:11-21). नंतर ख्रिस्त सैतानाला एक हजार वर्षांसाठी अथांग डोहात बांधून ठेवील आणि तो एक हजार वर्षाच्या कालखंडासाठी त्याच्या जगीक राज्यावर शासन करेल. (प्रकटीकरण 20:1-6).

एक हजार वर्षाच्या शेवटी सैतानाला बंधमुक्त करण्यात येईल, पुन्हा त्याला पराजित केले जाईल आणि नंतर त्याला अग्निसरोवरात अनंत काळासाठी टाकले जाईल (प्रकटीकरण 20:7-10). नंतर ख्रिस्त मोठ्या पांढर्‍या राजासनासमोर सर्व अविश्वासणार्‍यांचा न्याय करेल (प्रकटीकरण 20:10-15) व त्यासर्वांना अग्नि सरोवरात टाकेल. मग ख्रिस्त एक नवे आकाश, नवी पृथ्वी व नवे येरुशलेंम आणेल-विश्वासणार्‍यांचे सार्वकालिक वस्थिस्थान. तेथे पाप, दुख किवा मरण नसणार (प्रकटीकरण 21-22).

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

शेवटच्या काळाच्या भविष्यवाणीनुसार काय घडून येणार आहे?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.