हजार वर्षांचे राज्य काय आहे आणि ते वास्तविक आहे असे समजले पाहिजे का?

प्रश्नः हजार वर्षांचे राज्य काय आहे आणि ते वास्तविक आहे असे समजले पाहिजे का? उत्तरः हजार वर्षांचे राज्य हे येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील 1000 वर्षांच्या राज्याला दिलेले शीर्षक आहे. काहीजण ह्या 1000 वर्षांपर्यंतच्या राज्याला रुपकात्मक पद्धतीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. पृथ्वीवरील येशू ख्रिस्ताचे वास्तविक , शारीरिक राज्य नसून लोक त्याला “दीर्घ कालावधी” दर्शविण्यासाठी एक लाक्षणिक पद्धतीचा…

प्रश्नः

हजार वर्षांचे राज्य काय आहे आणि ते वास्तविक आहे असे समजले पाहिजे का?

उत्तरः

हजार वर्षांचे राज्य हे येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील 1000 वर्षांच्या राज्याला दिलेले शीर्षक आहे. काहीजण ह्या 1000 वर्षांपर्यंतच्या राज्याला रुपकात्मक पद्धतीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. पृथ्वीवरील येशू ख्रिस्ताचे वास्तविक , शारीरिक राज्य नसून लोक त्याला “दीर्घ कालावधी” दर्शविण्यासाठी एक लाक्षणिक पद्धतीचा अर्थ समजतात , तथापि, प्रकटीकरण 20: 2-7 मध्ये सहा वेळा, हजार वर्षांचे राज्य विशेषतः 1000 वर्षे काळाचे आहे असे म्हटले जाते. जर देवाने “दीर्घ कालावधी” बोलण्याची इच्छा व्यक्त केली, तर तो सहजपणे स्पष्ट न करता आणि वारंवार एक निश्चित कालावधीची उल्लेख करू शकला असता.

पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की जेव्हा ख्रिस्त पृथ्वीवर परत येईल तेव्हा तो दाविदाच्या सिंहासनावर बसून जेरूसलेममध्ये राजा म्हणून स्वत: ला स्थापित करेल (लूक 1: 32-33). बिनशर्त करार हे येशू ख्रिस्ताच्या प्रत्यक्ष, शाररिक रूपाने राज्य स्थापन करण्याची मागणी करतात. अब्राहामाशी केलेल्या करारामुळे इस्राएल लोकांना भूमी, वंश आणि शासक आणि आध्यात्मिक आशीर्वाद मिळाले (उत्पत्ती 12: 1-3). पॅलेस्टीयन कराराद्वारे इस्राएलाचे त्यांच्या भूमीत पुनर्वसन आणि जमीनिचा ताबा मिळेल असे अभिवचन दिले होते (वचन 30: 1-10). दाविदाशी केलेला करार इस्राएल राष्ट्राला क्षमा करण्याचे वचन देतो-ज्यायोगे राष्ट्राला आशीर्वाद मिळू शकेल (यिर्मया 31: 31-34).

येशूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळी हे सर्व करार पूर्णत्वास येतील कारण इस्राएल हे इतर राष्ट्रातून पुन्हा एकत्रित होतील (मत्तय 24:31),त्यांचे तारण होईल (जखऱ्या 12: 10-14), आणि येशू ख्रिस्त मशीहाच्या, नियमानुसार त्यांच्या भूमीत पुनःस्थापित केले जातील. पवित्र शास्त्रात सहस्रवर्षाच्या काळात शाररिक आणि आध्यात्मिक वातावरण परिपूर्ण राहील असे संगितले आहे. हा शांतीचा एक काळ असेल (मीखा 4: 2-4; यशया 32: 17-18), आनंद (यशया 61: 7, 10), सांत्वन (यशया 40: 1-2) आणि दारिद्र्य किंवा आजारपण नसणार (आमोस 9: 13-15; योएल 2: 28-29). पवित्र शास्त्र आपल्याला हे देखील सांगते की केवळ विश्वासणारेच हजार वर्षांच्या राज्यामध्ये प्रवेश करतील म्हणूनच, संपूर्ण काळचर्या (मत्तय 25:37; स्तोत्र 24: 3-4), आज्ञाधारकता (यिर्मया 31:33), पवित्रता (यशया 35: 8), सत्य (यशया 65:16) आणि पवित्र आत्म्याची परिपूर्णता असेल (जोएल 2: 28-29). ख्रिस्त राजा म्हणून दाविदाच्या बदल्यात राज्य करील (यशया 9: 3-7; 11: 1-10), (यिर्मया 33: 15-21; आमोस 9: 11). त्याचे सरदार आणि राज्यकर्ते न्यायाने सत्ता चालवतील (यशया 32: 1; मत्तय 1 9: 28), आणि येरुशलेंम हे जगाचे राजकीय केंद्र असेल (जखऱ्या 8: 3).

प्रकटीकरण 20: 2-7 मध्ये एक हजार वर्षाच्या काळातील राज्याचा अचूक कालावधी दिला जातो. या शास्त्रवचनांशिवाय, अगणित इतर लोक आहेत जे पृथ्वीवरील मशीहाच्या शाब्दिक राज्याशी संबंधित आहेत. देवाचे अनेक करार आणि अभिवचन पूर्ण होणे शाश्वत, भौतिक, भावी राज्य यावर अवलंबून आहे. शाब्दिक किवा वास्तविक हजार वर्षांचे राज्य नाकारण्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत त्यामुळे हा 1000 वर्षाचाच काळ आहे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

हजार वर्षांचे राज्य काय आहे आणि ते वास्तविक आहे असे समजले पाहिजे का?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.