प्रकटीकरणातील चार घोडेस्वार कोण आहेत?

प्रश्नः प्रकटीकरणातील चार घोडेस्वार कोण आहेत? उत्तरः प्रकटीकरणाचा चार घोडेस्वाराचे वर्णन अध्याय 6, वचन 1-8 मध्ये करण्यात आले आहे. चार घोडेस्वार शेवटच्या काही घडणार्‍या वेगवेगळîा घटनांचे प्रतीकात्मक वर्णन आहेत. प्रकटीकरणाच्या पहिल्या घोड्याचा उल्लेख प्रकटी 6:2 मध्ये आला आहे: “मग मी पाहिले तो एक ‘पांढरा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडलाय त्याच्याजवळ धनुष्य होते,…

प्रश्नः

प्रकटीकरणातील चार घोडेस्वार कोण आहेत?

उत्तरः

प्रकटीकरणाचा चार घोडेस्वाराचे वर्णन अध्याय 6, वचन 1-8 मध्ये करण्यात आले आहे. चार घोडेस्वार शेवटच्या काही घडणार्‍या वेगवेगळîा घटनांचे प्रतीकात्मक वर्णन आहेत. प्रकटीकरणाच्या पहिल्या घोड्याचा उल्लेख प्रकटी 6:2 मध्ये आला आहे: “मग मी पाहिले तो एक ‘पांढरा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडलाय त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुकुट देण्यात आलाय तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला.” हा पहिला घोडेस्वार शक्य तो ख्रिस्तविरोधकाचा उल्लेख करतो ज्याला अधिकार देण्यात येईल आणि त्याचा विरोध करणार्‍या सर्वांवर तो विजय मिळवील. ख्रिस्तविरोधक खर्‍या ख्रिस्ताची, जो पांढर्‍या घोड्यावर स्वार होऊन येईल, खोटी नकल करणारा आहे (प्रकटी 19:11-16).

प्रकटीकरणाचा दुसरा घोडेस्वार प्रकटी 6:4 मध्ये दिसतो, “तेव्हा दुसरा ‘घोडेस्वार’ निघाला; तो ‘अग्निवर्ण’ होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करवण्याचे काम सोपवले होते; त्याला मोठी तलवार देण्यात आली होती.” दुसरा घोडेस्वार भयंकर युद्धाचा उल्लेख करतो जे शेवटच्या काळी घडून येईल. तिसर्‍या घोडेस्वाराचे वर्णन प्रकटी 6:5,6 मध्ये करण्यात आले आहे, “मग मी पाहिले तो एक ‘काळा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला कोणीएक माझ्या दृष्टीस पडला; त्याच्या हातात तराजू होते; आणि जणू काय चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी: “रुपयाला शेरभर गहू, आणि रुपयाला तीन शेर जवय तेल व द्राक्षारस ह्यांची हानी करू नकोस!” प्रकटीकरणाचा तिसरा घोडेस्वार येणार्‍या मोठ्या दुष्काळाचा उल्लेख करतो, शक्यतः दुसर्‍या घोडेस्वाराच्या युद्धाचे परिणाम म्हणून.

चैथ्या घोडेस्वाराचा उल्लेख प्रकटी 6:8 मध्ये करण्यात आला आहे, “मग मी पाहिले, तो एक फिकट रंगाचा ‘घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला, त्याचे नाव ‘मृत्यू’, आणि ‘अधोलोक’ त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना ‘तलवारीने, दुष्काळाने, मरीने व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना जिवे मारण्याचा’ अधिकार पृथ्वीच्या चैथ्या भागावर देण्यात आला.” प्रकटीकरणाचा चैथा घोडेस्वार मृत्यू आणि विध्वंस यांचे प्रतीक आहे. हा मागील घोडेस्वारांचा संयोग वाटतो. प्रकटीकरणाचा चैथा घोडेस्वार भयानक पीडा आणि रोगांसोबत आणखी युद्ध व भयंकर दुष्काळ घेऊन येईल. सर्वात अद्भुत, किंवा कदाचित भयावह गोष्ट ही आहे की प्रकटीकरणाचे चार घोडेस्वार क्लेश काळात नंतर येणार्‍या भयंकर न्यायदंडाचे केवळ “पूर्वचित्र” आहेत (प्रकटी अध्याय 8-9 आणि 16).

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

प्रकटीकरणातील चार घोडेस्वार कोण आहेत?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.